Header AD

अवनी गतिमंद निवासी विद्यालयात झेंडावंदन उत्साहात महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानची विद्यार्थ्यांना मदत



ठाणे , प्रतिनिधी  : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरबाड जवळील अवनी गतिमंद निवासी विद्यालय येथे महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात येऊन ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त अवनी गतिमंद निवासी विद्यालय येथे झेंडा वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 



         यावेळी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले, या प्रसंगी गतिमंद मुलांना सांभाळताना खूप मोठी काळजी घेतली जाते, मुलांच्या अडीअडचणी समजून घेणे आवश्यक असते, खऱ्या अर्थाने या अवनी गतिमंद निवासी विद्यालयातील संस्थापिका प्रतिभा इरकशेट्टी विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेत असल्याचे प्रतिष्ठाचे अध्यक्ष अमोल कदम यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले.





 

          तसेच अवनी निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिले जात आहे, एक महिला ही शाळा चालवत असून अवनी शाळा भविष्यात खूप मोठी होईल असे ज्येष्ठ वकील संध्या जाधव यांनी सांगितले. या झेंडा वंदन कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मदत म्हणून अवनी निवासी विद्यालयाला ब्लॅंकेट, धान्य आणि साहित्य देण्यात आले.



         या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, ज्येष्ठ वकील संध्या जाधव, अवनी शाळेतील संस्थापिका प्रतिभा इरकशेट्टी, ऋषिकेश इरकशेट्टी तसेच प्रतिष्ठानच्या संपर्क प्रमुख नम्रता पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा जाधव, उपाध्यक्ष अश्विनी कुंभार, सुवर्णा भोईर, सुनीता मामीडाल, संतोष पांडे, राजेश्वरी नायगावकर आदी उपस्थित होते. 

अवनी गतिमंद निवासी विद्यालयात झेंडावंदन उत्साहात महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानची विद्यार्थ्यांना मदत अवनी गतिमंद निवासी विद्यालयात झेंडावंदन उत्साहात महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानची विद्यार्थ्यांना मदत Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads