Header AD

रक्षाबंधनाच्या दिनी शिवसेनेच्या वतीने महिलांना मोफत लसीची भेट ...
डोंबिवली ( शंकर जाधव )करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना कल्याण-डोंबिवलीत गेल्या पाच दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे.अश्यावेळी लस मिळणार तरी कशी असा प्रश्न पडला आहे.तस महिला वर्गालाही लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.शिवसैनिक बाळा ( गोरखनाथ ) म्हात्रे हे अनेक दिवसांपासून त्याच्या प्रभागातील नागरिकांना लस मिळावी याकरता पालिका प्रशासनाकडे पाठपूरावा करत होते.        पालिका प्रशासनाने त्याची मागणी पूर्ण करत रक्षाबंधनदिनी त्यांना करोना प्रतिबंधक लस देण्याचे  
आश्वासन दिले होते.त्यानुसार रक्षाबंधनदिनी पालिकेच्या सहकार्याने डोंबिवली पश्चिमेकडील गरिबाचा वाडा येथिल अनमोल नगरी परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक बाळा म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली. 
         सुमारे २००पेक्षा जास्त महिलांना लस देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी शिवसेनेचे आभार मानले.तर शिवसैनिक बाळा म्हात्रे , संदीप सामंत,अवि मानकर , मनोज वैद्य , ऍड गणेश पाटील यासह अनेक शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
रक्षाबंधनाच्या दिनी शिवसेनेच्या वतीने महिलांना मोफत लसीची भेट ... रक्षाबंधनाच्या दिनी शिवसेनेच्या वतीने महिलांना मोफत लसीची भेट ... Reviewed by News1 Marathi on August 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे

■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.... कल्याण, कुणाल म्हात्रे  :  मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन...

Post AD

home ads