Header AD

ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांबाबत नितीन गडकरीं कडून विविध निर्णय


केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, किसन कथोरेंचा पुढाकार...


भिवंडी, दि. ५ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विविध निर्णय घेतले आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने काल दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण आदेश दिले.         कल्याण जवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओव्हरब्रिज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता, वरप-कांबा ते माळशेज घाट रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहणाचे आदेश, शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक व गार्डन बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा आदेश मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.          माळशेज घाटात नवीन बोगदा तयार करण्यासाठी दोन हजार ४७८ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही देण्यात आले.
या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती होती.
ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांबाबत नितीन गडकरीं कडून विविध निर्णय ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांबाबत नितीन गडकरीं कडून विविध निर्णय Reviewed by News1 Marathi on August 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads