Header AD

कल्याणच्या तहसीलदारांसह शिपायाला लाच घेताना अटक


■ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले रंगेहाथ   लाचखोरी प्रकरणामुळे तहसील कार्यालयाच्या कारभाराचे निघाले पुरते वाभाडे....                      

 

कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे  : बांधकाम कंपनीच्या मौजै वरप येथील जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्याप्रकरणी एकुण १लाख २०हजार रु.लाच प्रकरणी तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कल्याण तहसीलदार दिपक आडकेशिपाई बाबु उर्फ मनोहर हरड या दोघा लाचखोरांना सोमवारी दुपारी ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने कल्याण तहसीलदार कार्यालयातील दालनात रंगेहाथ पकडल्याने लाच खोरीचे ग्रहण कल्याण तहसीलदार कार्यालया लागल्याचे समोर आल्याने येथील भ्रष्ट कारभाराचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे चित्र दिसत आहे.बांधकाम कंपनीच्या वरप येथील घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी २६आँगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदाराकडे १ लाख २० हजार रू. लाचेची मागणी तहसीलदार आकडे यांनी केली होती. 
त्या लाचेतील १ लाख रु. स्वतः साठी तसेच कार्यालीन शिपाई मनोहर हरड याने स्टाँफकरिता २० हजार रू. लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारी नुसार पडताळणी करीत सोमवारी दुपारी ठाणे लाचलुचपत विभागाचे पोनि संतोष शेवाळेसहकारी  पोना प्रशांत घोलप मपोना जयश्री पवार,  पोशि विनोद जाधवपोशि पद्माकर पारधी, पोहवा महाले यांच्या पथकाने डॉ. पंजाबराव उगले पोलीस अधीक्षक लाप्रवि, ठाणे परिक्षेत्रनिलिमा कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि. यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तहसीलदार कार्यालयात सापाळा लावित कल्याण तहसीलदार दिपक आडकेशिपाई मनोहर हरड यांना दालनात लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने तहसीलदार कार्यालयातील दलाल, लाचखोरीच्या ग्रहणांच्या चर्चा सर्वसामान्यापासुन सर्वच स्तरात रंगल्या होत्या.

कल्याणच्या तहसीलदारांसह शिपायाला लाच घेताना अटक कल्याणच्या तहसीलदारांसह शिपायाला लाच घेताना अटक Reviewed by News1 Marathi on August 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads