Header AD

गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लुट कॉंग्रेसने विचारला जाब
ठाणे , प्रतिनिधी  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच केंद्र सरकारकडून सिलेंडरच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ करीत आहे. असे असतांना दुसरीकडे गॅस एजन्सीकडून ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून बुक केलेल्या सिलेंडरचे पैसे भरल्यानंतरही सिलेंडर डिलिवरीच्या वेळेस वाढीव पैसे मागून नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला. तसेच याबाबत गॅस एजन्सीमध्ये धाव घेवून संबंधिताना धारेवर धरत जाब विचारला.           कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या लोकांचे कंबरडे मोडले असताना त्यात भर म्हणून की काय सरकारकडून सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे सबसिडी बंद करत लोकांच्या अडचणीत वाढ केलेली आहे. हि बाब काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी गॅस एजन्सीमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांनी एका ग्राहकाने 16 ऑगस्ट रोजी सिलेंडर ऑर्डर बुक करून ऑनलाइन पेमेंट केले. 834.50 रुपयाचे पेमेंट मिळाल्याचा अधिकृत मेसेज बीपीसीएल कडून त्यांना प्राप्त झाला.           बुक केलेल्या सिलेंडरची 17 ऑगस्ट रोजी डिलिव्हरी करताना  सिलेंडरचे भाव वाढलेले असल्याचे कारण देत जादा 25 रुपयाची आकारणी केली. पावती बघितली असतात पावतीवर केलेल्या ऑनलाइन पेमेंटची नोंद ऍडव्हान्स पेमेंट 834.50 अशी केलेली होती. त्या रकमे खाली नेट 25 अशा रकमेची नोंद होती. दुसरीकडे, नियमाप्रमाणे सिलेंडर बुक करत त्याचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने केलेले होते.            परंतु त्या नंतर वाढलेली रक्कम बीपीसीएल अथवा त्यांची एजन्सी आकारू शकतच नाही. जर ही वाढीव रक्कम आकारायची असेल तर तिचा समावेश मूळ किमतीत असला पाहिजे. जेणेकरून त्या रकमेवर सीजीएसटी व एसजीएसटीची आकारणी होईल. परंतु ही रक्कम मूळ किमतीत समावेश न करता  ग्राहकांना भुर्दंड देत कोणाच्या खिशात जाते असा सवाल उपस्थित करीत एजन्सीला पिंगळे यांनी जाब विचारला. इंटक अध्यक्ष सचिन शिंदे,श्रीकांत गाडीलकर,सागर लबडे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.कोट :-


             कॅशलेस इंडियाकडे वाटचाल करत असताना गॅस कंपन्यानि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना आवाहन केलेले आहे. त्याला प्रतिसाद देत लोक डिजिटल पेमेंट च्या माध्यमातून बुक केलेल्या सिलेंडरचे पैसे भरत आहेत. डिजिटल पेमेंट करून सिलेंडर बुकींग झाल्यावर डिलिवरीच्या वेळेस वाढीव पैसे मागून नागरिकांची लूट केली जात आहे. 

           - राहुल पिंगळे, अध्यक्ष, ओबीसी विभाग कॉंग्रेस, ठाणे.

गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लुट कॉंग्रेसने विचारला जाब  गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लुट कॉंग्रेसने विचारला जाब Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads