Header AD

कैकाडी समाजासह १४ जमातींना सोलापूर सेटलमेंटच्या जागेत घरे बांधून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे उपोषण


■मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सोडवले उपोषण....

 

कल्याण , कुणाल म्हात्रे  : सोलापूर येथील कैकाडी समाजासह १४ जमातींना सेटलमेंट येथील संपूर्ण जमीन देऊन त्यावर पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून द्यावीत यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मंगळवारी उपोषण केले. महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष एस.एल. गायकवाड यांच्या वतीने या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. 

इंग्रजांना त्रासदायक वाटणाऱ्या जातींना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवून तारेच्या कंपाउंड मध्ये बंदीस्त केले होतेत्यामध्ये कैकाडी समाजासह एकूण १४ जमातींचा समावेश होता. एकूण भारतात ५२ सेटलमेंट केले होतेत्यापैकी सोलापुरात एक सेटलमेंट आहे. ३१ ऑगस्ट १९५२  रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी समाजाला मुक्त केले. 

सोलापुरातील सेटलमेंट येथे गुन्हेगार जमातीच्या नावावर ७/१२  असलेल्या सदर जमिनीवर या कैकाडी समाजासह १४ जमातीतील बेघर व भूमिहीन बांधवांना घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते. 
या उपोषणस्थळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन माजी आमदार नरेंद्र पवार व आंदोलकांची भेट घेऊन उपोषण सोडविले. तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय मांडून सदर जमीन संदर्भात स्वतंत्र बैठक लावून विषय मार्गी लागण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांना दिले.
दरम्यान या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीने उपोषण मागे घेतले. मागण्यांवर सकारात्मक विचार करून विषय सोडवला नाही तर येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. 

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष एस. एल. गायकवाडभाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश संयोजक अमोल गायकवाडशिवराज गायकवाडकार्याध्यक्ष नारायण गायकवाडअंबादास जाधवबापू नंदूरकरभारत जाधवसतीश मानेदशरथ गायकवाडरघुनाथ जाधवविजय जाधवरेखा गायकवाड आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

कैकाडी समाजासह १४ जमातींना सोलापूर सेटलमेंटच्या जागेत घरे बांधून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे उपोषण कैकाडी समाजासह १४ जमातींना सोलापूर सेटलमेंटच्या जागेत घरे बांधून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे उपोषण Reviewed by News1 Marathi on August 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads