Header AD

साई लीला सार्वजानिक उत्सव मंडळ आणि क्रिकेट ग्रुप (९० फिट रोड ) ठाकुर्लीचा चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

                                  डोंबिवली ( शंकर जाधव ) साई लीला सार्वजानिक उत्सव मंडळ आणि क्रिकेट ग्रुप ( ९० फिट रोड ) ठाकुर्ली  यांच्या तर्फे सर्वोदय लीला सोसायटीतील सभासदांना एक आवाहन करण्यात आले होते की, चिपळूण येथे झालेल्या नैसर्गिक आपत्ती करिता व पूरग्रस्त यांना मदत करण्याकरता आपल्या तर्फे धान्य(तांदुळ, गहू, डाळी,तेल पॅकेट इ. किंवा अन्य काही उपयोगी वस्तू) पाठवण्याचा विचार केलेला आहे.            त्या आवाहन प्रतिसाद देत रहिवाशांनी धान्य रुपी मदत केली.त्यामध्ये तांदुळ,गव्हाचा आटा, साखर,तेल, मीठ, वेगवेगळ्या डाळी,मसाला पॅकेट, साबण,ब्रश, कोलगेट, फिनेल,झाडू, खराटे,कपडे,असे किमान ८० ते १२५  वेगवेगळे पॅकेट करून त्या सोबत पिण्याच्या पाण्याचे १५०० बॉटल देण्यात आल्या. 
            या कामाकरीता सोसायटीतील साई लीला सार्वजानिक उत्सव मंडळ आणि क्रिकेट ग्रुप यांची मोलाची मदत झाली, यामध्ये  नितीन बोबाटे,प्रियेश पवार,नितीन कदम,अखिलेश गुप्ता, परवेझ सर ,हरिओम ,चेतन, बंटी, निलेश,प्रेम,अक्षय,विनोद,रितेश, मोनिश, माही,सागर,पंकज,योगेश फापाळे,हरेश भाई,पांगरे काका,कुलकर्णी काका, प्रविण, स्वप्निल, जॉय वर्गीस ,गोपाला कृष्णा,सोसायटी चेअरमन श्री देशमाने,सचिव  इंगळे  यांची ही विशेष मदत झाली,हे धान्य भाजप पदाधिकारी मिहीर देसाई यांना सुपूर्द करण्यात आले. चिपळूण येथील पूरग्रस्तांना दिले जाणार आहे.
साई लीला सार्वजानिक उत्सव मंडळ आणि क्रिकेट ग्रुप (९० फिट रोड ) ठाकुर्लीचा चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा साई लीला सार्वजानिक उत्सव मंडळ आणि क्रिकेट ग्रुप (९० फिट रोड ) ठाकुर्लीचा चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा Reviewed by News1 Marathi on August 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता प...

Post AD

home ads