Header AD

डोंबिवली स्मशान भूमीतील गॅस शव दाहिनी बंद

 डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली पूर्वेकडील  शिव मंदिर स्मशानात  गॅस शव दाहिनी बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शहरातील इतर स्मशानभूमीत भार येण्याची दाट शक्यता असून  एकूणच स्मशानभूमीत सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे या सगळ्यामुळे सामन्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.           कल्याण डोंबिवली शहरात पायाभूत सुविधांची बोंब असल्याने जगताना त्रास सहन करावा लागत असतानाच मरणानंतरही माणसाला यातना सहन कराव्या लागत आहेत. मुळात ही शव दाहिनी १५ वर्ष जुनी आहे.  कोरोना काळात यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याने ती बंद न करता डिझेल वर चालणारी ही शव दाहिनी गॅसवर सुरू करण्यात आली. मात्र तौक्ते चक्रीवादळाने गॅस  शव दाहिनीची चिमणी  मोडून पडली आणि शेवटच्या घटका मोजत असणारी शव दाहिनी पूर्णतः बंद पडली.             विशेष म्हणजे गॅस शव दाहिनी बंद असल्याने सध्या गरिबाना देखील परवडत नसला तरी लाकडाचा खर्च करावा लागत आहे. तसेच  कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तर पाथर्डी येथील स्मशानूमीत घेऊन जावे लागत आहे. तिथे देखील एकच शव दाहिनी असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेत गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. चौकट 

इतकेच नव्हे तर जुन्या स्मशानाची वीट भट्टी देखील नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रेत जाळणे खूप कठीण जात आहे. ब्लोअर खराब झाला आहे. ब्लोअरची बटणे गेली आहेत त्यामुळे ब्लोअरची हवा वर जात नाही. दोन मोठ्या केबल खराब झाल्या आहेत. आदी समस्यांमुळे गोर-गरीब लोकांसाठी त्या त्रासदायक ठरत आहेत. अंतिम संस्कारासाठी जे नागरिक येतात त्यांना 2500 ते 2700 रुपये लकडासाठी खर्ची करावे लागतात. त्याचप्रमाणे रॉकेलसाठी 500 रुपये खर्च होतात. लाकडे ओली असल्याने रॉकेल जास्त लागते. लाकडासाठी वखार किंवा शेड असली तरी गोळा केलेली लाकडे ओली होतात. काही वेळा टायरचा वापर केल्याने प्रदूषण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होतो.चौकट 


शिव मंदिर स्मशानभूमीत असणारी ही शव दाहिनी १५ वर्ष जुनी आहे. ती कोरोना काळात यंत्रणेवर ताण असताना बदलणे शक्य नसल्याने ती डिझेलची शव दाहिनी गॅस वर करण्यात आली. मात्र तौक्ते चक्रीवादळात गॅस शव दाहिनीची चिमणी मोडून पडली सध्या नवीन चीमणीचा प्रस्ताव सादर केला असून लवकरच काम सुरू करण्यात येईल.  शशिम केदार, उप अभियंता , कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी
डोंबिवली स्मशान भूमीतील गॅस शव दाहिनी बंद डोंबिवली स्मशान भूमीतील गॅस शव दाहिनी बंद Reviewed by News1 Marathi on August 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads