Header AD

सार्वजनिक वाचनालया कडून चिपळूणच्या पूरग्रस्त ग्रंथालयास लाखमोलाच्या ग्रंथांची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाकडून चिपळूणच्या पूरग्रस्त ग्रंथालयास लाखमोलाच्या ग्रंथांची भेट देण्यात आली आहे.


नुकत्याच आलेल्या महापुरात चिपळूणच्या बाबासाहेब आंबेडकर आणि खेर्डी वाचनालयाचे  फार मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीतून संस्थामाणसं उभी राहणं हे माणसांसाठी आणि संस्थेसाठी महत्वाचं असतं आणि ते समाजाचं उत्तरदायित्वही असतं. पावसाच्या तडाख्यात या वाचनालयांची हजारो पुस्तके खराब झाली. हे झालेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे. तरी आपला खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक वाचनालय कल्याणने केलेल्या आवाहनानुसार काही दिवसांतच वाचकांनी अनेक पुस्तके जमा केली. अशी एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे दहा रुपये किंमतीची दोन ते अडीच हजार पुस्तके सार्वजनिक वाचनालय कल्याण व समस्त कल्याणकरांच्या वतीने दोन्ही वाचनालयाच्या कार्यकारिणी मंडळाकडे सुपूर्द करण्यात आली.

            या कामात वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी
उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णीसरचिटणीस भिकू बारस्करचिटणीस आशा जोशीकार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपीग्रंथपाल गौरी देवळेसहाय्यक ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.
सार्वजनिक वाचनालया कडून चिपळूणच्या पूरग्रस्त ग्रंथालयास लाखमोलाच्या ग्रंथांची भेट सार्वजनिक वाचनालया कडून चिपळूणच्या पूरग्रस्त ग्रंथालयास लाखमोलाच्या ग्रंथांची भेट Reviewed by News1 Marathi on August 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads