Header AD

यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा इशारा


■शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेची भाजपकडून मागणी


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजपकडूनशिवसेनेला यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी  दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला होता.


केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर कल्याणात मात्र शिवसेनेकडून निषेध करण्यासह भाजपच्या शहर कार्यालयावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली.


 त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. शिवसेनेमध्ये खरोखर हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहीजे होता. यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.


      यावेळी शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेजिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रेशहर सरचिटणीस स्वप्नील काठेगौरव गुजरपंकज उपाध्यायनिखिल चव्हाण,  संजय कारभारीरितेश फडकेशत्रुघ्न भोईर, डॉ. राजू राम, मिथिल जोशी, महिला प्रदेश सचीव प्रिया शर्मानगरसेविका वैशाली पाटील, महिला अध्यक्ष ज्योती भोईर, रेखा तरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा इशारा यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा इशारा Reviewed by News1 Marathi on August 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads