Header AD

हॉटेल व्यावसायिकांना लावलेली जाचक अट रद्द करावी रिपब्लिकन पक्षाची मागणी

 


नवी मुंबई , प्रतिनिधी  :  कोरोनाचे निर्बंध शिथिल करत असताना राज्य मंत्रिमंडळाने हॉटेल व्यावसायिकांना रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे परंतु ही परवानगी देत असताना हॉटेलमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम लावण्यात आले आहेत. 



               लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस झालेल्या कर्मचाऱ्यांना हॉटेल मध्ये काम करता येणार आहे. हॉटेल मध्ये काम करत असलेला कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील असल्यामुळे त्यांना लस घेण्यात अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊ शकले नाही. 



              मंत्री मंडळाने लावलेल्या या नियमामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तरी या नियमातून मध्यम मार्ग काढून सदर जाचक अट रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हॉटेल व्यावसायिकांना लावलेली जाचक अट रद्द करावी रिपब्लिकन पक्षाची मागणी हॉटेल व्यावसायिकांना लावलेली जाचक अट रद्द करावी रिपब्लिकन पक्षाची मागणी Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads