Header AD

स्व. मोहन दामू माळी यांच्या जन्म दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने पूरग्रस्तांना मदत

डोंबिवली ( शंकर जाधव ) कोकण व पश्चिम महाराष्ट्रात  ओढवलेल्या पुरपरिस्थितीमुळे पूरग्रस्तांना मदत करा असे शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  व राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले होते.           शिवसेनेचे माजी सभापती स्व. मोहन दामू माळी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशनात आणून शिवसेना डोंबिवली ग्रामीनचे विधानसभा क्षेत्रप्रमुख  एकनाथ पाटील व राष्ट्रवादीचे कल्याण, डोंबिवली जिल्हा सचिव  ऍड. ब्रम्हा माळी व शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलखूष माळी, सुनील मालणकर, उपविभाग प्रमुख नितिन माळी,  रमेश पाटील यांच्या पुढाकाराने पूरग्रस्त नागरीकांना कल्याण डोंबिवली महानगर पालीकेतील वार्ड क्र. ११४ मधील टीवकदादा नगर, भोपर नाळ्याजवळील चाळींचा परीसर, माऊली मुक्ताई नगर, एकविरा चाळ, या पुरग्रस्त नागरिकांना एक मदतीचा हात म्हणुन अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.           त्यावेळी उपस्थत राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष गजानन पाटील,वार्ड अध्यक्ष योगेश डांगे, पांडुरंग पाटील, मधुकर माळी, राष्ट्रवादी युवकचे अभय भुवड, अक्षय वंजारे, शाखाप्रमुख संतोष माळी, रोशन पाटील, सागर पाटील आदी शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे सभासद उपस्थित होते.
स्व. मोहन दामू माळी यांच्या जन्म दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने पूरग्रस्तांना मदत स्व. मोहन दामू माळी यांच्या जन्म दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने पूरग्रस्तांना मदत Reviewed by News1 Marathi on August 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads