Header AD

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही - सतीश देसाई ठाणे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड




कल्याण , कुणाल  म्हात्रे  राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाहीअशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेलाअसा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.


मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. त्यात काही चुकीचं केलंयावर मनसेचे पुण्यातील काही कार्यकर्ते विचारांच्या गोष्टी न करता गुंड यांच्या गोष्टी करू नयेत मुद्द्यावर बोलावे व पोकळ धमक्या संभाजी ब्रिगेडला देऊ नये असा इशारा संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांनी मनसेला दिला आहे.



 संभाजी ब्रिगेड हि संघटना फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. हे ध्यानात घ्यावेगल्लीच्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि वेळ पडली तर गल्लीत सुध्दा फिरू देणार नाही असा टोला संभाजी ब्रिगडचे ठाणे जिल्हाध्यक्ष देसाई यांनी लगावला आहे.


राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही - सतीश देसाई ठाणे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही -  सतीश देसाई  ठाणे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड Reviewed by News1 Marathi on August 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads