Header AD

कल्याणची जलपरी श्रावणी जाधवचा सन्मान

 



कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने  जिल्ह्यातील जलतरण या खेळा मध्ये विशेष प्राविण्य आणि कामगिरी करणाऱ्या जलतरण पट्टू आणि पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार समारंभ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता.



            यामध्ये  प्रामुख्याने  कल्याणची जलपरी म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते शुभम वनमालीअश्विनकुमारनील शेकटकरमंत्रा कुऱ्हे यांचा स्विमिन्ग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मेजारी व उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.  



             याप्रसंगी उमेश उत्तेकर किरण फाटकराजेश गावडे, संकेत सावंतनिमेश भोई, रुपाली रेपाळे, पंकज राठोड, अंनिरुद्ध महाडिक, शशिकांत काळे, चंद्रशेखर निबरें, स्वतेज कोळंबकर,  डॉक्टर तृप्ती कुऱ्हे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याणची जलपरी श्रावणी जाधवचा सन्मान कल्याणची जलपरी श्रावणी जाधवचा सन्मान Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads