Header AD

प्रख्यात ब्रँडच्या रिब्रँडिंगचे फायदे

 ■बाजारपेठेतील कल झपाट्याने बदलत असतात त्यामुळे नवीन घडामोडींचे प्रतिबिंब असलेली ब्रँड ओळख अद्ययावत करणे आणि ती टिकवून ठेवणे आव्हानात्मक काम आहे. परंतू कंपनीच्या विस्तारासाठी, वाढीसाठी आणि ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी रिब्रँडिंग अपरिहार्य आहे. कोणत्याही रिब्रँडिंगचे मुख्य उद्दीष्ट व्यवसाय वृद्धिंगत करणे असला तरी स्पर्धेत आपला झेंडा फडकावत ठेवणं हा महत्त्वाचा उद्देश असतो. कंपन्या बाजारात ब्रँडच्या पुनर्स्थापनेचा फायदा कसा घेऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती देताहेत एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.    नवीन ग्राहकांची पूर्तता करणे: काळ आणि नवीन तंत्रज्ञानाच्या घडामोडींमुळे, ब्रँडच्या लक्ष्यित प्रेक्षकांमध्ये वर्षानुवर्षे बदल करणे स्वाभाविक आहे. तुम्ही जेनझेड आणि मिलेनियल्सच्या नवीन गरजांशी जुळवून घेतले असेल, परंतू तुमचा ब्रँड किंवा त्याची ओळख कदाचित त्यांचे प्रतिबिंब दाखवत नसेल तर जुनी ओळख टिकवून ठेवणे हे स्थिरतेच्या बिंदूवर आदळणे म्हणूनही समजले जाऊ शकते, ज्यामुळे कंपनी आव्हानात्मक युगात भरकटलेली दिसते. परिणामी नवीन ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी ब्रँडची ओळख बदलणे हे रिब्रँडिंगचे महत्त्वाचे कारण आहे. नवीन व्यवसायपैलूंवर लक्ष केंद्रित करणारी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी रिब्रँडिंगची प्रक्रिया नवीन ग्राहकांना सहज आकर्षित करु शकते.      नवीन कंपन्यांशी स्पर्धा करणे: आजकाल तंत्रज्ञानामुळे नवीन कल्पनेसह व्यवसाय करणे कोणाला ही सहज साध्य झाले आहे. बाजारातील अडथळ्यांची शर्यत कमी झाल्याने प्रत्येक विभागात स्पर्धेचे आव्हान उभे ठाकले आहे. तरुण उद्योजक नवीन ब्रॅंड बाजारात उतरवून तरुणाईला भुरळ घालत आहेत. सहाजिकच त्यामुळे या नव्या ब्रॅंडची सध्या चलती आहे.एक जूना खेळाडू ब्रँड म्हणून, आपल्याला बाजारपेठेच्या मागण्यांशी जुळवून घ्यावं लागेल आणि अशा परिस्थितीत स्वतः ला समरुसून घ्यावं लागेल. ट्रेंडी ओळखीमुळे स्पर्धेत आघाडी घेता येईल. अनेक दशके ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याने तुम्ही ग्राहकांचा विश्वास जिंकलेला असतो, त्याचा फायदा या स्पर्धेत मिळतो. चांगल्या विचाराने रिब्रँडिंगची प्रक्रिया कंपनीच्या वाढीत भर घालते.       नवीन उद्दीष्टे आणि उपाय प्रतिबिंबित करणे: शेवटी, गेल्या काही वर्षांत तुम्ही प्रचंड बदल आत्मसात केला असेल. नवीन अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आणि नवीन जमान्यातील दुवा तुम्हाला साधला असेल तर तुम्हाला नवीन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करता येतील, परंतु आपली ब्रँड ओळख कदाचित साधता येत नसेल तर आपली उत्पादने अद्ययावत ठेवण्यासाठी आपले सर्व प्रयत्न असूनही कंपनीला मंदीचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातील बदलाचा, नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्याचा रिब्रँडिंग हा चांगला मार्ग आहे. हे केवळ आपल्या अलीकडील प्रयत्नांचे प्रतिबिंबच नाही तर आपली अंतिम ध्येये देखील अधोरेखित करेल. निर्धाराने मोहीम राबवली तर तुम्ही बहुसंख्य ग्राहकांपर्यंत पोहचू शकता.      याशिवाय, रिब्रँडिंगचे असंख्य फायदे आहेत. व्यवसायांत उत्तुंग झेप घेण्यासाठी आणि अमर्याद वाढीसाठी याचा फायदा होतो. तथापि, रिब्रँडिंग जेवढं जबरदस्त तेवढंच कठीण असू शकते, म्हणून आपण त्याचे चांगले नियोजन केले पाहिजे. उद्देश समजून घेऊन सुरुवात करा, काही ध्येये निश्चित करा आणि नंतर कृती करा. स्पष्टता आणि महत्त्वाकांक्षेशिवाय, रिब्रँडिंग व्यर्थ ठरते. म्हणूनच, कंपनीतील प्रत्येकाला या प्रक्रियेत सहभागी करून सर्वांची मोट बांधा आणि रिब्रॅंडिंगच्या स्वप्नाचा विस्तार करा.

प्रख्यात ब्रँडच्या रिब्रँडिंगचे फायदे प्रख्यात ब्रँडच्या रिब्रँडिंगचे फायदे Reviewed by News1 Marathi on August 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads