Header AD

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला जाणीवपूर्वक दिली जाते विशिष्ट दिशा - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर


दाभोळकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या विषयावर ऑनलाईन’ विशेष संवाद...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला विशिष्ट दिशा जाणीवपूर्वक दिली जात आहेयाचा तपास व्हायला हवाअशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली. हिंदु जनजागृती समिती आयोजित दाभोळकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम १२ सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला.20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केली होती. नंतर सीबीआयकडे हा तपास आल्यावर त्यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना या प्रकरणी आरोपी ठरवून डॉ. वीरेंद्र तावडे यांना मुख्य सूत्रधार ठरवून अटक केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही उभे केले. नंतर वर्ष 2018 मध्ये याच सीबीआयचे तेच अधिकारी म्हणातात, ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी नाहीमात्र सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या.’ याला तपास म्हणायचा का या तपासाच्या विश्‍वासार्हतेविषयी कोणी बोलत नाही. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळत नाही. अजूनही डॉ. तावडे कारागृहात आहेत. या घटनेचा तपास योग्य पद्धतीने झालेला नसल्याचे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.अधिवक्ता इचलकरंजीकर पुढे म्हणाले, ‘दाभोळकर हत्या प्रकरणात एकूणच तपासयंत्रणांकडून सोयीनुसार सर्व गोष्टी भरकटवत नेल्या जात आहेत. हे न्यायालयात स्पष्ट होईलच. ज्या प्रकारे मडगाव प्रकरणात सनातन संस्थेच्या 6 साधकांची निर्दोष सुटका झाली. त्याप्रमाणे या प्रकरणातही असे होईलअशी आम्हाला आशा आहे. स्वत:ला विवेकवादी म्हणवणार्‍या दाभोळकरांच्या ट्रस्टमधील अनेक आर्थिक घोटाळे आम्ही पुराव्यानिशी उघड केले आहे. तशीच निरीक्षणे सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकअधीक्षक आणि साहाय्यक आयुक्त यांनी नोंदवली आहेत. इतकेच नव्हेतर याच संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ट्रस्टच्या कारभारावरतसेच तो ट्रस्ट स्वत:च्या नियंत्रणात ठेवू पाहणार्‍या दाभोळकर कुटुंबियांवर जाहीर आरोप केलेयातून आम्ही केलेले आरोप खरे होतेहेच सिद्ध होते. त्यामुळे अंनिसच्या गैरकारभाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. अंनिसच्या ट्रस्टवर तातडीने प्रशासक नेमला पाहिजे अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला जाणीवपूर्वक दिली जाते विशिष्ट दिशा - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला जाणीवपूर्वक दिली जाते विशिष्ट दिशा - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads