Header AD

बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर मनसेच्या पाठपुराव्यानंतर लेक सिटी हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल
ठाणे (प्रतिनिधी)  -  बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राईंडरचा वापर करणार्‍या लेक सिटी रुग्णालयाच्या एका सहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर संबधित रुग्णालयाने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यानंतर मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर पाठपुरावा केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.                   ए विंग, साई वात्सल्य अपार्टमेंट नितीन कंपनी जवळ,पाचपाखाडी ठाणे येथे राहणारा पार्थ सतीश टोपले (वय 14)  या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती. ही अगंठी निघत नसल्याने या मुलाची आई नामे शितल सतीश टोपले यांनी सदर मुलाला दि. 3 जुलै 2021 रोजी खोपट येथील लेक सिटी रुग्णालयामध्ये दवाउपचारासाठी नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकार्‍याने सदर मुलाकडे पाहिले नाही. रुग्णालयात उपस्थित असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन औषधे देऊन सदर मुलाला घरी पाठविले.               त्यानंतर याच रुग्णालयातील स्वप्नील होतकर नामक एका इसमाचा फोन शितल टोपले यांना आला. या इसमाने मी लेक सिटी रुग्णालयातून बोलत असून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी आपणाला पाठविले असल्याचे सांगितले. त्यास शितल टोपले यांनी समंती दिल्यानंतर स्वप्नील होतकर हा शितल टोपले यांच्या घरी आला अन् त्याने आपल्याकडील धारदार ग्राइंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. अंगठी निघत नसल्याने त्याचे पार्थ याचे बोटच कापून काढले.             या प्रकारानंतर पार्थ याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवाजी रुग्णालयात नेले असता, तेथे त्याच्या बोटाला गँगरीन झाले असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी कांगारु पद्धतीची शस्त्रक्रियाा करण्यात आली. त्याच्या हातावर तसेच पोटावर शस्त्रक्रिया करुन सदरचे बोट सुमारे महिनाभर पोटामध्ये ठेवून आता ते त्याच्या हाताला जोडण्यात आले आहे. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून या प्रकारामुळे पार्थ याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सध्या त्याचे बोट निकामी झाले असल्याचे शितल टोपले यांनी सांगितले.             लेक सिटी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या हाताला गैंगरीन होण्याचा धोका निर्माण झाला असतानाही उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. ही बााब टोपले कुटुंबियांनी अक्षय करंजवकर यांना सांगितल्यानंतर  त्यांनी शनिवारी नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशार्‍यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी लेक सिटी रुग्णालयाचा परवाना रद्द करावा; अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही करंजवकर यांनी दिला आहे.

बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर मनसेच्या पाठपुराव्यानंतर लेक सिटी हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर मनसेच्या पाठपुराव्यानंतर लेक सिटी हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads