Header AD

केडीएमसीच्या लसीकरणाच्या कुपनचा काळाबाजार नागरिकांचा आरोप


■अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ आणि संताप...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  १५ ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्याने केडीएमसीच्या कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर आज तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. मात्र या गर्दीच्या नियोजनासाठी केडीएमसी प्रशासनाकडून किंवा ज्या खासगी एजन्सीला लसीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.विशेष म्हणजे लस घेण्यासाठी अनेक जण काल रात्रीपासून तर काही जण पहाटेपासून रांगेत उभे होते. ही रांग सुमारे दिड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठी होती. यावरूनच लसीकरणासाठी आज उसळलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज येऊ शकतो. रांगेमध्ये ज्येष्ठ नागरिकमहिलायुवक सर्वच जण लस घेण्यासाठी उभे होते. तर लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लसीचे टोकन न मिळाल्याने संतप्त झालेल्या सोनाली पाठारे या तरुणीने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. तसेच कुपन वाटण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत एवढ्या लवकर कुपन कसे काय संपले असा संतप्त सवाल उपस्थित केला. या नागरिकांचा संताप पाहता अखेर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मग लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर एवढा सगळा गोंधळ सुरू असताना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालिका मुख्यालयातून केडीएमसीचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित नव्हता. सगळा गोंधळ शांत झाल्यावर आणि गर्दी ओसरल्यावर मग पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्याचे आणि कुपन व्यवस्थितपणे वाटले गेल्याचा दावा यावेळी केला.दरम्यान राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच 15 ऑगस्टपासून 2 लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे साहजिकच लस घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार हे स्पष्ट होते. मात्र त्यानंतरही केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारचे नियोजन आढळून आले नाही. ज्याची प्रचिती अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडलेल्या गोंधळातून आज पुन्हा एकदा आली. यातून केडीएमसी प्रशासन कधी आणि कसा धडा घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. 

केडीएमसीच्या लसीकरणाच्या कुपनचा काळाबाजार नागरिकांचा आरोप केडीएमसीच्या लसीकरणाच्या कुपनचा काळाबाजार नागरिकांचा आरोप    Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads