Header AD

अदिवासी कुटुबीयांना अन्नधान्य किटचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते वाटप
कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील वाडेघर,टिटवाळा, बल्याणी येथील आदिवासी कुटुंबियांना खावटी योजनेअंतर्गत अन्न धान्य कीटचे वाटप आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.     महाराष्ट्र सरकारच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आदिवासी कुटुंबियांना मदत करण्यासाठी अन्नधान्य खावटी योजना २०२०-२१ सुरु केली आहे. या योजने अंतर्गत अनुसुचित जमातीच्या प्रति कुटुंबास ४ हजार रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार रुपये रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित २ हजार रुपयांचे वस्तुस्वरुपात अन्नधान्याचे किट वाटपाचे काम जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कल्याण मधील वाडेघर तसेच टिटवाळा व बल्याणी येथील आदिवासी पाडा या ठिकाणी  कल्याण पश्चिम आमदार  विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले.आमदार विश्वनाथ भोईर यांनी तळागाळातील गोर गरीब वंचित घटकातील अदिवासी कुटुंबाना शासनाच्या खावटी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देत अदिवासी कुटुंबीयांना दिलासा दिल्याचे चित्र लाभार्थी अदिवासी कुटुंबीयांमध्ये यानिमित्ताने दिसत होते. याप्रसंगी परिवहन समिती सदस्य  सुनील खारुक,  माजी नगरसेवक जयवंत भोईर आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

अदिवासी कुटुबीयांना अन्नधान्य किटचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते वाटप अदिवासी कुटुबीयांना अन्नधान्य किटचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते वाटप   Reviewed by News1 Marathi on August 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads