Header AD

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ


■पाईपलाईन आणि रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरवात...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला असून वाडेघर येथे पाईपलाईन तर मंगेशी ड्रीम सिटी येथे रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटकरणाच्या कामाला रविवारी सुरवात करण्यात आली आहे.   


वाडेघर येथील नीलकंठ श्रुष्टी परसिराचा झपाट्याने विकास होत आहे. मोठं मोठी गृहसंकुले या भागात उभी राहत आहेत परिणामी पाणी वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याने या भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली होती. वारंवार इथले नागरिक पाण्याची समस्या घेऊन आमदारांकडे जात होते. आमदार विश्वनाथ भोईर या ठिकाणी काही कामानिमित्त गेले असतांना तेथील महिलांचा होत असणारा त्रास त्यांनी बघितला होता. तेव्हाच हि समस्या सोडविण्याचे त्यांनी ठरवलं होतं. विशेष म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सणाच्या दिवशीच या भगिनींना एक आगळी वेगळी भेट आमदार भोईर यांनी दिली आहे. याठिकाणी आमदार निधीतून नवीन पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.त्याचप्रमाणे काही अपवाद वगळता कल्याण मधील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीट चे झाले  आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी  स्वतः कल्याणकरांना याबाबत वचन दिले होते. त्यानंतर गेल्या ६ वर्षांत उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटिकरण करण्यात आले. प्रमुख रस्त्यांसोबतच शहरातील अनेक रस्तेउपरस्ते,गल्ली बोळातही हे काम सुरू आहे. कल्याणकारांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी  शिवसेना वचनबद्ध असून त्याचाच एक भाग म्हणून आमदार विकास निधीतून कल्याण पश्चिमेतील मंगेशी ड्रीम सिटी ते भागीरथी नगर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अरविंद मोरे, क.डों.मा.पा क्षेत्र संघटक रवींद्र कपोते, नगरसेवक प्रभुनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेविका वैशाली विश्वनाथ भोईर, परिवहन समिती सदस्य सुनील खारूक, माजी नगरसेवक सुनील वायले, शिवसेना शाखा प्रमुख वंडार करभारी, युवासेना विभाग अधिकारी वैभव भोईर तसेच शिवसैनिक आणि परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads