Header AD

भरदिवसा घरफोडी करून लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिम परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून कपाटातील लाखों रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारा  चोरटाला  महिन्याभरानंतर जेरबंद करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले.  राहुल सिल्वराज मुपनार उर्फराहुल हाल्या दिवा, (वय २९ वर्षे) प्रकाश उर्फ बुवा सिताराम सोनवणे (वय. ४२ वर्षे)अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून ते विरार पूर्वेत असलेल्या एकाच चाळीत राहणारे आहेत. तर दिपक दशरथ कदम. (वय ३४ वर्षे,) याने चोरटा प्रकाश याला आसरा दिल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे.शैलेजा वसंत कदरकर, (वय ५१ वर्षे,) ह्या कल्याण पश्चिम, भारताचार्य वैद्य परिसरातील  जानकीदास सेल्टरया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. ५ जुलै २०२१ रोजी दुपारच्या सुमाराला त्या कामा निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी राहुल व प्रकाश यांनी  घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे मंगळसूत्रचैननेकलेसआगठीकडेटॉप्सझुमके व लॉकेट असा एकूण ९.५ तोळे  सोने व ७ हजार रुपये  रोख  असा एकूण ४लाख ४६हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत  होते. त्याच सुमाराला   शैलेजा ह्या काम आटपून घरी जात  इमारतीच्या जिना चढत  असतानाचघरातून एक  चोरटा दिसताच त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करीत चोरट्याचा पाय पकडून ठेवला. त्यानंतर  नागरीकांच्या मदतीने  राहुल या चोरट्याला  रंगेहाथ पकडले. मात्र  दुसरा चोरटा  प्रकाश उर्फ बुवा मुद्देमाल घेऊन पळून गेला होता.शैलेजा वसंत कदरकरयांनी घटनेच्या दिवशीच बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघा चोरटयांनी दागिने लंपास केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे)  सानप  यांच्यासह  डी.बी. पथकाचे पोलीस कर्मचारी यांचे २ पथके तयार करण्यात आले. या पथकाने  गुन्हयात रंगेहाथ पकडण्यात आलेला आरोपी राहुल याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करूनत्याचेकडून त्याचे इतर साथीदारांचे ठावठिकाण्यांची माहीती घेतली.  मात्र  आरोपी  सराईत गुन्हेगार असल्याने  वारंवार मोबाईल क्रमांक  व राहण्याचे ठिकाण बदलत होते.पोलीस पथकाने  गुप्त बातमीदारांमार्फत गुप्त बातमी मिळवुनतसेच तांत्रिक माहीती प्राप्त करूनधुळे व पुणे जिल्हयात तपास केला. त्यावेळी  गुन्हयात घटनास्थळावरून पळून गेलेला आरोपी प्रकाश उर्फ बुवा सिताराम सोनवणे याला पुणे येथून शिताफिने सापळा रचून  अटक केली. शिवाय  घरफोडीत  चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी एकूण ८.५ तोळे वजनाचे सोने असा ३लाख ९९हजार ५००  रूपये किंमतीचा माल हस्तगत केला.घरफोडीच्या  गुन्हयात आणखी एक आरोपी  दिपक  याने मुद्देमाल घेऊन पळून गेलेला आरोपी प्रकाश उर्फ बुवा याला घरात आसरा  देउन पोलीसांपासून अटकेचे संरक्षण केले बद्दल अटक करण्यात आली आहे. तर चोरटयांकडून हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे दागिने शैलेजा वसंत कदरकर यांना  पोलीस उप आयुक्त विवेक  पानसरे  हस्ते  परत करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने  शैलेजा यांनी  आनंद व्यक्त करीत  बाजारपेठ पोलीसांचे  आभार मानले आहेत.

 

भरदिवसा घरफोडी करून लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक भरदिवसा घरफोडी करून लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads