Header AD

भिवंडीत वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास केली बेदम मारहाण ,मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

भिवंडी दि 13 (प्रतिनिधी ) शहराच्या नजीक काटई ग्रामपंचायत हद्दीत प्लास्टिक मणी बनविणाऱ्या कारखानदारास तीन जणांच्या टोळक्याने वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून लोखंडी रॉड , दगड, लाकडी दंडक्याने बेदम मारहाण केली यामध्ये व्यापाऱ्याच्या पायास फॅक्चर झाले असून ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे .
         

           अमीर खान असे बेदम मारहाण झालेल्या प्लास्टिक मणी कारखानदाराचे नाव रात्री ते आपल्या कारखान्यातुन घरी जाण्यासाठी निघाले असता सायंकाळी 8. 45 वा च्या सुमारास त्या ठिकाणी अमोल गुरुनाथ पाटील,मेहबूब जब्बार पटेल ,शादाब अहमद आफताब अन्सारी  हे त्या ठिकाणी येऊन अमोल चे वडील गुरुनाथ पाटील यांना कारखानदार अमीर खान याने शिवीगाळ केल्याचा जाब विचारीत  त्यास या तिघा जणांनी लोखंडी रॉड, दगड ,लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली .
           परिसरातील नागरीक अमीर खान यास वाचविण्यासाठी पुढे आले असता त्यांना ही या टोळक्याने धमकावीत मारहाण केली .या मानहाणी नंतर टोळके त्या ठिकाणाहून पसार झाले तर जखमी अमीर खान यांना खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या पायास फॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे .    
            या प्रकरणी निजमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अमोल गुरुनाथ पाटील ,
मेहबूब जब्बार पटेल ,शादाब अहमद आफताब अन्सारी यांना अटक केली आहे .दरम्यान या संपूर्ण मारहाणीची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे .
भिवंडीत वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास केली बेदम मारहाण ,मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद भिवंडीत वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास केली बेदम मारहाण ,मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads