Header AD

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालयशेजारी असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्वच्छता नियमित होत नाही. परिणामी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करा अशी मागणी करत गुरुवारी वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केले.उपोषण मागे घ्यावे यासाठी पालिका प्रशासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसरातील स्वच्छता होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्यात आले.

 


   

         गुरुवारी पूर्वेकडील इंदिराचौक येथे वंचित बहुजन आघाडी माध्यमातून वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.यावेळी राजू काकडेमिलींद साळवेबाजीराव मानेअर्जुन केदारअशोक गायकवाडवैशाली कांबळेअस्मिता सरोदेशांताराम तेलंग आदी पदाधिकारी उपोषणाला बसले होते.यावेळी सुरेंद्र ठोके म्हणालेडोंबिवली शहरातील आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे शहरात महापालिकेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले आहे. 

       मात्र स्मारकाची उभारणी केल्यापासून महापालिकेचा कोणताही कर्मचारी साफसफाई करत नव्हता. तसेच पालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन अधिकारी वर्गाच्या निदर्शनास वरील बाब लक्षात आणून दिली.दरम्यान तत्कालीन प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य अधिकारी तसेच साफसफाई कर्मचारी स्मारकाची तसेच परिसराची सफाई करा असे निर्देश देऊनही ते साफसफाई करीत नव्हते. त्यामुळे अशा कामचुकांना निलंबित करा अशी मागणी वंचितने केली होती. 

        परंतु तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे गुरुवारी वंचितने निषेध उपोषण आंदोलन केले आंदोलनाची दखल घेऊन प्रभागक्षेत्र अधिकारी  बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसरातील स्वच्छता होई असे लेखी आश्वासन `` प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन Reviewed by News1 Marathi on August 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads