Header AD

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केडीएमसीच्या सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकासह साथीदार गजाआड
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली आहे. रिक्षाच्या हूडचा  रंग युनिक असल्याने पोलिसांनी १६ तासाच्या आत प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारास बेडय़ा ठोकल्या आहेत. अजय कांबळे असे रिक्षा चालकाचं नाव असून रशीद शेख असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे. हे दोघे कल्याण पूर्व भागातील पत्रिपुल श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत.आकाश जैयस्वाल याने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील निक्कीनगर  चौकातून कल्याण स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्न स्थळी घेऊन गेला. आकाश जवळली महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सह प्रवासी पसार झाले.
 मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या १६ तासात रिक्षाचालकासह त्याचा साथीदाराला गजाआड केलं असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केडीएमसीच्या सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकासह साथीदार गजाआड प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक  केडीएमसीच्या सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकासह साथीदार गजाआड Reviewed by News1 Marathi on August 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads