Header AD

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात नेत्र तपासणी शिबिर संपन्न

 



ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपाध्यक्ष रचना वैद्य यांनी लायन्स क्लबच्या सहयोगाने गांधी नगर येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. 



          राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात गांधी नगर परिसरातील शेकडो लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत रक्त तपासण्याही करण्यात आल्या.



            या प्रसंगी हिंदी भाषी सेलचे अध्यक्ष प्रभाकर सिंह, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख कैलास हावळे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, कौस्तुभ धुमाळ, विरु कांबळे, वॉर्ड अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सुभाष आग्रे,  रामचंद्र सकपाळ हे उपस्थित होते. 



            या शिबिराच्या आयोजनात रचना वैद्य यांच्यासह राजनाथ सिंह, साहेब राजभर, निलेश यादव, गौतम मोरे, रामप्रित राजभर, सोमनाथ दाभाडे, किशोर डोंगरे, सुनील बर्मा, रामचंद्र सकपाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात नेत्र तपासणी शिबिर संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात नेत्र तपासणी शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads