Header AD

फास्टटॅगमुळे लागला हत्येससह कार चोरीचा उलगडा कार चालकाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपीना अटक कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची कारवाई
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कार चालकाची हत्या करत कार चोरून उत्तर प्रदेश मध्ये पळवून नेत कारची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या  रॅकेटचा कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कार मध्ये लावण्यात आलेल्या फास्टटॅग, टोल नाक्यावरील सीसीटीव्ही मुळे  हत्या व कार चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कार चालकाची हत्या करून त्याचा  हातपाय बांधून कसारा घाटात फेकून देण्यात आलेला मृतदेह देखील पोलिसांनी ताब्यात घेत तो कुटुंबाच्या हवाली केला आहे.कल्याण मधून कार चोरून ती उत्तरप्रदेश नेऊन विकण्याच्या बहाण्याने भदोई येथून राहुलकुमार गौतमधर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतमविशालकुमार गौतमकरणकुमार गौतम बचई गौतम असे पाच जण ३  ऑगस्ट रोजी कल्याणात आले. कल्याण स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण ते धुळे जाण्यासाठी उबेर कंपनीची कार बुक केली. कंपनीकडून अमृत गावडे या ३५ वर्षीय कार चालकाला हे भाडे देण्यात आले. दिघा नवी मुबई येथे राहणारा अमृतने कल्याणच्या शिवाजी चौकातून या पाच आरोपींना गाडीत बसवून गाडी धुळ्याच्या दिशेने वळवली.मात्र तयारीनिशी आलेल्या आरोपींनी रस्ता सुनसान होताच अमृतच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली यानंतर त्याचा मृतदेह दोरीने बांधून तो कसारा घाटात फेकून देत गाडी घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेले. मात्र कार मालकाने या गाडीला फास्टटॅग ऑन केलेला असल्यामुळे गाडीने टोल नाका क्रॉस करताच मालकाच्या खात्यातून टोल नाक्याचा चार्ज कापला जात असल्यामुळे मालकाला गाडी उत्तर प्रदेश मध्ये पोहचल्याचे  लक्षात आले. दरम्यान चालकाचा कोणताही संपर्क होत नसल्याने मालक प्रमोद कुमार गुप्ता याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत गाडीसह चालक हरविल्याची तक्रार दाखल केली होती.यात त्याने गाडी उत्तर प्रदेशपर्यत पोचल्याची माहिती दिल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने टोल नाल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा ठाव ठिकाणा शोधला. यानंतर उत्तर प्रदेश मधील भदोई गावातून आरोपी राहुलकुमार गौतमधर्मेंद्रकुमार गौतम,  अमन गौतम या तीन आरोपीसह चोरलेली कार आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यारचालकाचा,मोबाईलआधारकार्डपनकार्डमास्टरकार्डआर सीबुकरेल्वेची पावती जप्त करण्यात आली आहे.तर उर्वरित तीन आरोपीचा शोध उत्तर प्रदेश पोलिसाच्या मदतीने सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.  दरम्यान गॅरेज चालक अमन गौतम याने चोरीची गाडी विकण्याची तयारी केली होती मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपीना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

फास्टटॅगमुळे लागला हत्येससह कार चोरीचा उलगडा कार चालकाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपीना अटक कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची कारवाई फास्टटॅगमुळे लागला हत्येससह कार चोरीचा उलगडा कार चालकाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपीना अटक कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads