Header AD

मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये गावा साठी ११ लाखांची मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनसे आमदार राजू पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी तळीये गावासाठी 11 लाखाचा धनादेश दिला.मूसळधार पावसामुळे महाडखेडचिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात पूर आला होता. यात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या सेवेला सामाजिक संस्था आणि मनसे कार्यकर्ते धावून गेले आहेत. पूरग्रस्तांना डोंबिवली मनसे तर्फे सुद्धा अन्नधान्यकपडे तसेच गृहउपयोगी वस्तू देण्यात आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्याचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. मंगळवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी महाडतळीयेखेड येथे पाहणी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आमदार पाटीलसरचिटणीस मनोज चव्हाण यांनी जेवढी मदत करता येईल तेव्हडी मदत मनसे पक्षाकडून केली जाईल असे सांगितले. दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गावात जाऊन सुद्धा मनसे आमदार पाटील यांनी पाहणी केली. तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळून दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेची सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. आता याच गावाला आमदार राजू पाटील यांच्याकडून ११  लाखाचा धनादेश दिला आहे. मनसे आमदार यांनी खेड गावातील बाजारपेठची सुद्धा पाहणी केली. यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकरसरचिटणीस मनोज चव्हाणजिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईरजिल्हा संघटक हर्षद पाटीलडोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरतसंदीप म्हात्रेयोगेश पाटील आणि महाड/खेड/डोंबिवलीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये गावा साठी ११ लाखांची मदत मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये गावा साठी ११ लाखांची मदत Reviewed by News1 Marathi on August 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads