Header AD

देशव्यापी संपात डोंबिवलीकर सराफ सहभागी सांकेतिक क्रमांक देण्यास विरोध
डोंबिवली  ( शंकर जाधव )  सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेला प्रमाणित करणाऱ्या हॉलमार्किंगचे स्वागत आहे. मात्र प्रत्येक दागिन्याला देण्यात येणारा एचयु आय डी (सांकेतिक क्रमांक)  वेगळा असल्याने तो अव्यवहार्य आणि मनमानी असल्याचे सांगत  डोंबिवलीतील सराफानी देखील या देशव्यापी आंदोलनात सहभाग दर्शविला आहे. 
            डोंबिवली शहरात एकूण ४०० सराफांची दुकाने आहेत. या सर्व सराफ संपात सहभागी झाले होते.सोन्याची शुद्धता ग्राहकांना देणे हे मान्य आहे. मात्र दागिन्यांना सांकेतिक क्रमांक देणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एखादा ग्राहक तत्काळ खरेदीसाठी येतो. 

       त्यावेळी त्याला एका मंगळसूत्र आवडते तर दुसऱ्या मंगळसूत्राची वाटी आवडते.अशावेळी ते आम्ही सहज बदलून देतो. मात्र आता  दागिन्यांच्या डिझाईनमध्ये अदलाबदली झाल्यानंतर पूर्ण दगिन्याला सांकेतिक क्रमांक देण्यासाठी पुन्हा चार दिवसाचा कालावधी लागणार त्यामुळे ग्राहकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे . 
 

      तसेच यामुळे लिखाण काम वाढणार असल्याने कर्मचारी देखील वाढवावे लागतील. मुळातच बंदीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला सराफ व्यवसाय अतिरिक्त कामामुळे आणखीन डबघाईला जाण्याची भीती  डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी व्यक्त केली.

  
       इतकेच नव्हे तर सातत्याने संप करणे परवडत नसून सरकारने  लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल  इंटोदियाउपाध्यक्ष जितेंद्र नाहर आदी मान्यवर उपस्थित होते.

देशव्यापी संपात डोंबिवलीकर सराफ सहभागी सांकेतिक क्रमांक देण्यास विरोध देशव्यापी संपात डोंबिवलीकर सराफ सहभागी सांकेतिक क्रमांक देण्यास विरोध Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads