Header AD

दिव्यातही फेरीवाल्यांचा हैदोस, रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा,कारवाई करा - रोहिदास मुंडेदिवा , प्रतिनिधी  :-  दिव्यातील सर्व रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापले असून भविष्यात यांच्या दादागिरीतून एखादी दुर्घटना घडू नये यासाठी आताच येथील फेरीवाले हटवून त्यांना मोकळ्या जागेत हलवा अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.           कासारवडवली येथे सहायक आयुक्तांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेला हल्ला गंभीर आहे.आम्ही या घटनेचा निषेध करतो असेही मुंडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.          अनधिकृत फेरीवाले हा विषय आता अधिक जटिल बनत चालला आहे.आर्थिक हितसंबंध असणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या आशीर्वाद शिवाय फेरीवाले मस्तवाल होऊ शकत नाहीत.दिव्या सारख्या शहरात एकही रस्ता मोकळा नाही.सर्व रस्ते,फुटपाथ हे फेरीवाले यांनी व्यापलेले आहेत.          जी घटना ठाण्यात घडली तशी घटना दिवा शहरात मुजोर फेरीवाले यांच्याकडून घडू शकते परिणामी आपण वेळीच दिव्यातील फेरीवाले यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.


 

          दिवा शहराला आधीच बकाल स्वरूप आले आहे त्यामुळे जागोजागी बसवण्यात आलेले फेरीवाले हटवून रस्ता मोकळा करावा,फेरीवाले यांच्यासाठी स्वतंत्र मैदान अथवा हॉकर्स झोन निर्माण करण्यात यावा.रस्त्यावरील फेरीवाले हटवावेत अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

दिव्यातही फेरीवाल्यांचा हैदोस, रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा,कारवाई करा - रोहिदास मुंडे दिव्यातही फेरीवाल्यांचा हैदोस, रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा,कारवाई करा - रोहिदास मुंडे Reviewed by News1 Marathi on August 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads