Header AD

आमदार राजू पाटील यांनी केली कल्याण शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.कल्याण शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर ३ महत्वाचे जंक्शन्स आहेत. कुशाला हॉटेलमानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.तर एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेतनुसत्या मंजुऱ्या येतातहोर्डिंग्ज लागतात. मात्र त्यांची कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा गौप्यस्फोटही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील असे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले.

आमदार राजू पाटील यांनी केली कल्याण शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार राजू पाटील यांनी केली कल्याण शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी Reviewed by News1 Marathi on August 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads