Header AD

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय


■नॉन क्रिमिलिअरची सक्ती आदेश मागे न घेतल्यास शासनाच्या विराधात तीव्र आंदोलन- नरेंद्र पवार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियामध्ये ओबीसीएन टीव्हीजेएनटीआणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती केली जात असून यामध्ये तातडीने बदल करावा अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहेयाबाबत नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आज निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.          मुंबई एमएमआर क्षेत्रासह राज्यातील अन्य भागात ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्याची विद्यार्थ्यांना सक्ती केली जात असून याचा फटका राज्यातील ओबीसीएसबीसीव्ही जे एन टी तसेच एन टी विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० ऑगस्ट असल्याने एव्हड्या कमी कालावधीत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर अनेक विशेष प्रवर्गएन टीव्ही जे एन टीव ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार आहे.वास्तविक पाहता मागील वर्षी अशा प्रमाणपत्राची कोणतीही अट शालेय शिक्षण विभागाने टाकली नव्हती. यंदा देखील कोरोनाचा काळ पाहता नॉन क्रिमिलिअर ची सक्ती करण्यात येऊ नये. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात. याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन एन टीव्ही जे एन टीएसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव या अन्यायाविरोधात शालेय शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहे.


११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय Reviewed by News1 Marathi on August 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads