Header AD

निवडणुकीच्या तोंडावर जागी झालेल्या काँग्रेसचा केडीएमसी निवडणुकीत स्वबळाचा नारा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने मरगळ झटकत काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यात साठी आलेल्या शिष्टमंडळातील प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार  असल्याचे सांगितले.स्थानिक पातळीवर पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कमकुवत असलेली काँगेस स्वबळावर लढून किती जागा निवडून घेऊन येईल या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात सेना राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस येथे स्वबळावर  लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत १२२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत फक्त कॉंग्रेसचे ४ नगरसेवक निवडून आले होते.महापालिकेत आयुक्तांना नागरी प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटेमाजी नगरसेवक रवी पाटीलकल्याण पूर्व अध्यक्ष शकील शेख आदी बरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवारस्त्याची दुरवस्थाअपुरा पाणी पुरवठाघन कचरा व्यवस्थापन करवाहतूक कोंडी, बी.एस.यु.पी घरे, कचोरे येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी,  स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पा तसेच शहरातील वाढते प्रदूषण या बाबत निवेदन देण्यात आले. 

निवडणुकीच्या तोंडावर जागी झालेल्या काँग्रेसचा केडीएमसी निवडणुकीत स्वबळाचा नारा निवडणुकीच्या तोंडावर जागी झालेल्या काँग्रेसचा केडीएमसी निवडणुकीत स्वबळाचा नारा Reviewed by News1 Marathi on August 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads