Header AD

भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू


■भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भुजबळांवर टीका....


कल्याण : स्वतःला विकास पुरुष समजणार्या छगन भुजबळांनी गरिब भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरविले तर आम्ही येवल्याचा विकास झाला असं समजू अशी टीका भाजपाचे माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केली.पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यादरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात त्यांचे आगमन झाले त्यावेळी पवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला. अनेक गरीबकामगार व पीडितांना रेशनचे मोफत धान्य मिळत नसून अनेक ठिकाणी घोटाळे होत आहे पण शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.नरेंद्र पवार यांचे येवला शहारामध्ये कार्यकर्तेपदाधिकारी व समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्यास सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व समाज बांधवांसोबत पवार यांनी संवाद साधला तसेच येवल्याचे विकास पुरुष म्हणवणाऱ्या भुजबळांनी येवला वासीयांना व विशेषतः भटके विमुक्त समाजाला मोफत अन्न धान्य पुरवठा केला तरी येवला तालुक्याचा विकास झाल्याचे समजले जाईल असे संबोधून भुजबळांच्या विकासाच्या गोष्टींना उत्तर दिले.

भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू Reviewed by News1 Marathi on August 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads