Header AD

यमराज शॉर्ट फिल्म हि समाजाला दिशा देणारी – मनीषा भोईर व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या यमराज शॉर्ट फिल्मचे उद्घाटन

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : व्यसनमुक्तीसाठी तयार होणारी शॉर्ट फिल्म यमराज ही निश्चितच समाजाला एक दिशा देणारी असेल. आज लोक वेगवेगळ्या कारणाने व्यसन करतात. त्याचे परिणाम स्वतः बरोबर कुटुंब आणि समाजावरही होत असतात. तेव्हा वेळीच स्वतःला सावरले पाहिजे. असे विचार यमराज लघुपटाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनिषा भोईर यांनी काढले.या शाँर्ट फिल्मच्या उद्घघाटनासाठी मनिषा भोईर सदस्य ग्रामपंचायत राहनाळप्रमिला कडू अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीप्रतिभा नाईकसहशिक्षिका अनघा दळवी,मोनिष कोळीया लघुचित्रपटात अभिनय करणारे शिक्षक सुनिल पाटीलकँमेरामन सुयश काळे आणि या लघुपटाचे लेखक दिग्दर्शक अजय पाटील हे उपस्थित होते.               समाज हा व्यसनमुक्त असायला हवा यासाठी सर्वांनी मिळून स्वतः बरोबर कुटुंब वाचवायला हवे.आपण आपल्या माणसांना हवे आहोत हे लक्षात घेऊन आपली वर्तणूक हवी हा विचार यमराज लघुचित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे लेखक दिग्दर्शक कलाकार अजय पाटील यांनी सांगितले.
 या लघुचित्रपटात सुनील पाटीलसाहिल कांबळे,अजय पाटील तसेच विद्यार्थ्यांनी सिद्धी देसाई यांनी अभिनय केला आहे. लवकरच हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यमराज शॉर्ट फिल्म हि समाजाला दिशा देणारी – मनीषा भोईर व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या यमराज शॉर्ट फिल्मचे उद्घाटन यमराज शॉर्ट फिल्म हि समाजाला दिशा देणारी – मनीषा भोईर व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या यमराज शॉर्ट फिल्मचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on August 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads