Header AD

विद्यार्थी भारती व मैत्रकूलच्या विद्यार्थ्यांची आगळीवेगळी रक्षाबंधन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : एकमेकांच्या धर्माला संकटात आणण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माची करूया रक्षा हा संदेश देत  हिंदूमुस्लिम, ख्रिश्चनजैनबौद्ध असे विविध धर्मीय लोकांनी एकमेकांना राखी बांधून एकमेकांच्या धर्माचा अपमान, अवहेलना करण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माची रक्षा केली पाहिजे हा संदेश विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी  दिला असल्याची माहिती  विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धूरी यांनी दिली.राखी बांधून रक्षा करण्यासाठी फक्त पुरुष बांधील नसून महिलांनी ही महिलांना राखी बांधून आपली रक्षा आपणही करू शकतो. हा संदेश दिला व अफगाणिस्तानात महिलांना ज्या पद्धतीने तालिबन्याच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. त्याचा निषेध करत आपल्याकडे किंवा आणखी कुठेही अशी परिस्थिती कधीच येऊ नये यासाठी महिलांना स्ट्रॉंग व्हावं लागेल हा संदेश विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा पूजा जया गणाई यांनी दिला.त्याच बरोबर छात्रशक्ती संस्थेच्या मार्फत कल्याण मधील लोनाड गावापुढच्या आदिवासी पाड्यात गरजू घरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून रक्षाबंधन साजरे करण्यात आले असल्याची माहिती मैत्रकूल प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थी भारती व मैत्रकूलच्या विद्यार्थ्यांची आगळीवेगळी रक्षाबंधन विद्यार्थी भारती व मैत्रकूलच्या विद्यार्थ्यांची आगळीवेगळी रक्षाबंधन Reviewed by News1 Marathi on August 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads