Header AD

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने कल्याण मध्ये आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून करदात्यांचा पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली निवडणूक कमिटीचे अध्यक्ष धनंजय जोगदंड आणि कार्यकारी अध्यक्ष मिथिलेश आणि नरेश ठाकुर यांनी केला आहे.कंत्राटदारांच्या मदतीने स्थानिक नगरसेवक भ्रष्टाचार करत असून खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे.  भ्रष्ट पक्षांचे उमेदवार दरवेळेस निवडणुकीच्या वेळी निवडणुकीच्या दरम्यान विविध आमिषे दाखवतात,  पैसे वाटतात दारू व चिकनची पार्टी देऊन आपले मत विकत घेतात. अशा भ्रष्ट पक्षांना मत न देता प्रामाणिक पक्षांना मत द्यावं असं आवाहन रुबेन म्हक्रेनस यांनी केलं.कल्याण डोंबिवली मधील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चालू केलेले असे अभिनव आंदोलन येत्या काळात राज्यातील सर्वच महानगरपालिकानगरपालिका व नगर परिषदांमध्ये आम आदमी पक्ष करून लोकांमध्ये जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी दिली.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन Reviewed by News1 Marathi on August 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads