Header AD

भारताचे नाव खेळात उंचावण्यासाठी डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा प्रयत्न विद्यार्थ्यांची खेळात रुची वाढवण्यासाठी शिक्षणासाठी व्याख्यान
डोंबिवली ( शंकर जाधव ) ऑलीन्पिक मध्ये पीटी उषा,अभिनव बिंद्रा,निरज चोप्रा,निराभाई चानू,रवी दहीया,लविना बोर्गोहेन, बजरंग पुनिया,टी.व्ही.सिंदू यांनी भारताचे नाव उंचावले होते.भारतातील अनेक नागरिक खेळात आपले प्रदर्शन करत असले तरी आजही खूप नागरीक असे आहेत कि त्यांना त्याच्यातील खेळाडूवृत्ती माहीत नसते.यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील कलागुण व विविध खेळांमधील आवड जोपासली तर उद्याच्या ऑलीन्पिक मध्ये भारत देशाचे नाव अधिकाधिक उंचावून पदकांची बरसात होईल अशी अशा डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेने शिक्षणासाठी व्याख्यान आयोजित केल्लेल्या व्याख्यानात व्यक्त केली.           राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी क्रीडा समितीच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद राणाप्रताप भवन येथील संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात येथे आहारक्रीडा व व्यायाम या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात मानवी शरीर हालचालींचे शास्त्र या विषयावर व्याख्याते डॉ.घनश्याम धोकटदुसऱ्या सत्रात खेळाडू घडताना या विषयावर व्याख्याते अंकुर आहेर, तिसऱ्या सत्रात व्यायाम-समज गैरसमज या विषयावर व्याख्याते संजय कुळकर्णी तर शेवटच्या सत्रात खेळाचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्याते आयुर्वेदाचार्यमान वैद्य विनय वेलणकर  यांनी व्याख्यान दिले.
         या व्याख्यानचा मुख्य उद्देश सांगताना वैद्य विनय वेलणकर  यांनी शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यामधील कला गुण व खेळामधील रुची जोपासण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी व्याख्यान भरविण्यात आले होते.विद्यार्थी शाळेत शिकत असताना प्रत्येकविद्यार्थी कुठल्या कलेत रुची ठेवतो,त्याला कोणत्या खेळात आवड आहे हे फक्त शिक्षकच ओळखू शकतो.म्हणून अश्या व्याख्यानात शिक्षकांना वक्ते माहित देतात.मला आशा आहे कि,आमच्या या संस्थेच्या हा प्रयत्न पाहुन प्रत्येक शाळा व संस्था अश्या प्रकारची व्याख्याने घेऊन विद्यार्थ्यांना खेळात पुढे आणतील अशी आशा आहे.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कांबळी यांनी तर प्रस्तावना संजय कुलकर्णी यांनी केली. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी संस्था सदस्य नाटेकर यांनी सांभाळली.या संस्थेतील शाळेमध्ये  आतापर्यत आंतरराष्ट्रीय पातळीवर जिम्नॅस्टिकमध्ये केतकी गोखले, मनिष गाडवे,राष्ट्रीयपातळीवर ५० ते ६० विद्यार्थी, प्रो कबड्डीत निलेश शिंदे यांनी तर राज्यपातळीवर कराटेमध्ये भूमी खोबरेक यांनी पदके मिळवली होती. शाळेतील क्रीडा शिक्षक रविंद्र पवार, विकास हिवाळे,लखपत जाधव यासह माजी मुख्याध्यापिका  विद्या कुलकर्णी  अनेक शिक्षकवर्ग अथक मेहनत घेत असतात.

भारताचे नाव खेळात उंचावण्यासाठी डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा प्रयत्न विद्यार्थ्यांची खेळात रुची वाढवण्यासाठी शिक्षणासाठी व्याख्यान भारताचे नाव खेळात उंचावण्यासाठी डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा प्रयत्न विद्यार्थ्यांची खेळात रुची वाढवण्यासाठी शिक्षणासाठी व्याख्यान Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे

■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.... कल्याण, कुणाल म्हात्रे  :  मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन...

Post AD

home ads