Header AD

करोना काळात खाजगी रुग्णवाहिका सरकारने ताब्यात घेणे आवश्यक होते - आमदार रविंद्र चव्हाण
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना महामारीच्या काळात रुग्णांना वेळेवर मिळत नव्हत्या. तर खाजगी रुग्णावाहिचे चार पटीने पैसे आकारले जात होते. अश्या वेळी सरकारने गरीब जनतेसाठी रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे आवश्यक होते. करोना काळात खाजगी रुग्णावाहिका सरकारने ताब्यात घेणे आवश्यक होते. समाजिक बांधिलकी म्हणून अनेक जनांनी पुढे येणे गरजेचे आहे.करोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात भाजप माजी नगसेवक महेश पाटील यांनी रुग्णसेवा म्हणून डोंबिवलीत मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.           महेश पाटील प्रतिष्ठान समर्पित रुग्णवाहिका सेवा लोकापर्ण सोहळा आमदार रविंद्र चव्हाण आणि  एम.डी.इंडो अमाईन्स लिमिटेडचे विजय पालकर याच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप माजी नगरसेवक महेश पाटील,भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील , खुशबू चौधरी यासह मनीषा राणे,मिहीर देसाई, संजय विचारे,मितेश पेणकर,मामा पगारे,पंढरीनाथ म्हात्रे, राजू शेख, विजय बाकडे आदिसह अनेक पदधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.        यावेळी आमदार चव्हाण म्हणाले,  या लोकापर्ण सोहळ्यातून जनतेपर्यत वेगळा मेसेज जाणे आवश्यक आहे. करोना काळात पेशंट व नातेवाईक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम होत होते. समाजाची भावना लक्षात घेऊन कोणीतरी पुढे येईल रुग्णवाहिकेची गरज आहे. टीका करायची नाही म्हणून त्यांना आम्ही साथ दिली. समाजिक बांधिलकी काय  असते ते महेश पाटील यांनी दाखविले होते.तर माजी नगरसेवक महेश पाटील म्हणाले, मी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे एकाचा तरी जीव वाचला तरी माझी मदत सार्थक ठरली असे समजेन. 

करोना काळात खाजगी रुग्णवाहिका सरकारने ताब्यात घेणे आवश्यक होते - आमदार रविंद्र चव्हाण करोना काळात खाजगी रुग्णवाहिका सरकारने ताब्यात घेणे आवश्यक होते  - आमदार रविंद्र चव्हाण Reviewed by News1 Marathi on August 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads