Header AD

आजचे विद्यार्थी उद्याचे नेते – डॉ. जे. पी. शुक्ला श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा


■अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ औषधी वनस्पतींचे केले पूजन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आजचे विद्यार्थी उदयाचे नेते असल्याचे मत डॉ. जे पी शुक्ला यांनी व्यक्त केले. समाज उद्धार समिति संचालित श्रीमती जी आर सी हिंदी हास्कूलच्या प्रांगणामध्ये वेगळ्या स्वरुपात स्वांतत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी फार्मासिस्ट पूजा भागवत, निवृत्त बँक कर्मचारी चंद्रमणि चौबे, समाजसेवक सुधाकर तिवारी, समाज उद्धार समितीचे संचालक बबन चौबे, भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे, स्थानीक जेष्ठ नागरिक तुकाराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केल्या नंतर विविध औषधि वनस्पतींचे पूजन करण्यात आले.  यावेळी विद्यार्थ्यांच्याहस्ते मान्यवारांचे सत्कार करण्यात आलेध्वज फडकवण्याआधी भूमिपूजन करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम ऑनलाइन स्वरुपात विद्यार्थ्याना दाखवण्यात आला. यावेळी 1747 ते 1947 पर्यंतचा इतिहास, संघर्षमय स्वातंत्र्याची माहिती देण्यात आली.           यावेळी साई होम्योपैथिक मेडिकल कॉलेजचे कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ. जे पी शुक्ला यांनी उपस्थित सर्व मान्यवारांचे स्वागत करत स्वातंत्र्याची गाथा लोकानां समजवून सांगितली. आजचे विद्यार्थी उद्याचे नेते आहे, त्यांना रितसर घडवा अशी विनंती केली.                
              या समारोहाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा पाटीलजयश्री पाटीलकरण पालशैलेंद्र तिवारी, सुनीता शेट्टी, सुजेन फ़र्नान्डिस, सीमा पाठक, पेटसी साहूवंदना संसारे,सारिका प्रजापति, ज्योति त्रिपाठी आदी शिक्षकांनी केले. उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात  राष्ट्रगीताचे  गायन करून झेंड्याला सलामी दिली.
आजचे विद्यार्थी उद्याचे नेते – डॉ. जे. पी. शुक्ला श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा आजचे विद्यार्थी उद्याचे नेते – डॉ. जे. पी. शुक्ला श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads