Header AD

भाजप आमदाराच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिक्षणासाठी लागणारे सॉफ्टवेअर बनवून देण्याच्या नावाखाली भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक करणा:या आरोपी आशिष चौधरी याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आशिष सोबत अजून किती लोक या गुन्ह्यात सहभागी आहेत. याचा तपास पोलिस करीत आहेत. 2018 ते 2021 या तीन वर्षात जवळपास 40 लाख रुपये आरोपीने घेतल्याचे उघड झाले आहे.भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने पकडलं आहे. या आरोपीने शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवून देतो असं सांगत आमदाराचे चिरंजीव प्रणव गायकवाड यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले होते. अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं आहे.प्रणव गायकवाड याची स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. प्रणवची कंपनी शिक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करत होती. या दरम्यान त्याची ओळख आशिषकुमार चौधरी नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने प्रणवच्या सॉफ्टवेअर कंपनीत शिक्षणाकरीता सॉफ्टवेअर तयार करुन देण्याच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक केल्याती माहिती उघड झाली आहे. संबंधित प्रकार हा 2018 ते 2020 या कालावधी घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदाराच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक भाजप आमदाराच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads