Header AD

क्विक हिलचे ‘आरोग्य यान’ वाशिममधील रुग्णांच्या सेवेसाठी रवाना
महाराष्ट्र, ११ ऑगस्ट २०२१ : भारताच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याकरिता आपली वचनबद्धता आणि सेवेला अधिक बळकटी देण्याकरिता,  क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडची सीएसआर शाखा क्विक हील फाउंडेशनने वाशिममधील अधिकाऱ्यांना दोन अत्याधुनिक वाहने ‘आरोग्य यान’ सुपूर्द केली. यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती अनुपमा काटकर, वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस, वाशिमचे जिल्हा परिषद सीईओ वासुमना पंत, असिस्टंट कलेक्टर श्री कुलदीप जंगम आणि क्विक हील फाउंडेशनचे सीएसआर मॅनेजर अजय शिर्के उपस्थित होते.         जानेवारी २०२१ मध्ये सुरु झालेला ‘आरोग्य यान’ हा उपक्रम क्विक हीलच्या, भारतातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याच्या दिशेने सुरु केलेल्या मोठ्या सीएसआर व्हिजनचा एक भाग आहे. या उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरील यश जाणून घेतल्यावर वाशिमचे माननीय असिस्टंट कलेक्टर श्री कुलदीप जंगम , क्विक हील फाउंडेशनशी संपर्क साधून त्यांच्या क्षेत्रातील आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना पाठींबा दिला. क्विक हील फाउंडेशनने त्यांची विनंती विनम्रपणे स्वीकारली आणि वचनबद्धतेनुसार, विक्रमी वेळेत रुग्णवाहिका पुरवल्या. क्विक हीलचे ‘आरोग्य यान’ वाशिममधील डॉक्टर आणि रुग्णांच्या दुर्गम भागातून रुग्णांची वाहतूक आणि नियमित तपासणी, निदान व उपचार यांसारख्या आरोग्य सेवा पुरवेल.    क्विक हील फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती अनुपमा काटकर म्हणाल्या, “ क्विक हील फाउंडेशन भारताच्या ग्रामीण भागात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. वाशिम येथील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. ‘ आरोग्य यान’ उपक्रमाद्वारे या भागातील लोकांच्या आरोग्य सेवाविषयक गरजा दीर्घ काळ पूर्ण करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. एक जबाबदार बिझनेस लीडर या नात्याने आम्ही उदात्त काम पुढे करतच राहू आणि भारतातील यशाची पुनरावृत्ती सुरुच ठेवू.”      

          वाशिममधील असिस्टंट कलेक्टर श्री कुलदीप जंगम पुढे म्हणाले, “ पीएचसीसाठी रुग्णवाहिकेची आमची विनंती क्विक हील फाउंडेशनने तत्काळ मान्य केली. त्यांनी प्रदान केलेल्या रुग्णवाहिकांमुळे येत्या काळात हजारोंना आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होईल.”

क्विक हिलचे ‘आरोग्य यान’ वाशिममधील रुग्णांच्या सेवेसाठी रवाना क्विक हिलचे ‘आरोग्य यान’ वाशिममधील रुग्णांच्या सेवेसाठी रवाना Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads