Header AD

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही - नरेंद्र पवार

 

ओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा...मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती...

कल्याण , कुणाल  म्हात्रे   जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत राज्यात निवडणूका होऊ देणार नाही असा इशारा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला. ओबीसी व इतर मागासवर्गीय समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्यात पवार बोलत होते.भाजपाने कायद्याने मिळविलेले आरक्षण राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रद्द झालं असून ओबीसी इतर मागासवर्गीय तसेच मराठा समाजावर राज्य सरकारने अन्याय केला असल्याची टीकाही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.              यावेळी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा  मुंडेमेळाव्याचे आयोजक व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोडराज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदेजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,  माजी मंत्री आ. अतुल सावेआमदार रमेश अप्पा कराड,  भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकरभाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेरावलातूरचे खासदार सुधाकर शृंगारेआ. तुषार राठोडआ. अभिमन्यु पवारभाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रेमाजी आमदार विनायकराव पाटीलप्रदेश प्रवक्ते गणेश हाकेमाजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरकिसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुखमाजी आमदार पाशा पटेलबब्रुवान खंदाडेजिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रेभटके विमुक्त प्रदेश सहसंयोजक देविदास राठोडडॉ गुलाबराव सांगळेऍड भाग्यश्री ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही - नरेंद्र पवार जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही - नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता प...

Post AD

home ads