Header AD

टीसीएलने नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च केले
मुंबई, २४ ऑगस्ट २०२१ : टीसीएलने आपला ४०वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च करत असल्याची घोषणा केली. टीसीएल हा आघाडीचा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असून काही अत्याधुनिक तंत्रज्ञान अविष्कार दर्शवणारी उत्पादने बाजारात आणून त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे.         नवीन ऑनलाइन ब्रँड स्टोअरमध्ये नवी उत्पादने, कार्यक्रम, आगामी उत्पादने आणि बऱ्याच गोष्टींची माहिती मिळण्याकरिता कंपनीने ग्राहकांना या वेबसाइटला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. यासोबतच ब्रँडने ग्राहकांसाठी इतर अनेक प्रोग्राम आणि उपक्रमांचीही घोषणा केली आहे.


      

       टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन यांच्या मते, “ ग्राहकांना नवा आणि यूझर-फ्रेंडली अनुभव प्रदान करणे हाच वेबसाइटची पुनर्रचना करण्यामागचा मुख्य हेतू आहे. ४०वा वर्धापन दिन हा ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्यासोबतच ही एक नवी सुरुवात देखील आहे. ग्राहककेंद्रित उत्पादने आणि सेवा वितरित अधिक उच्चतम उद्दिष्ट गाठण्याच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. भारतीय ग्राहकांनी नेहमीच आम्हाला पाठींबा दिला आहे आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आहे."

टीसीएलने नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च केले टीसीएलने नवे ऑनलाइन ब्रँड स्टोअर लॉन्च केले Reviewed by News1 Marathi on August 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads