Header AD

राष्ट्रवादीची कोकणातील पूरग्रस्तांना मदत

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोकणात आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अशा पूरग्रस्त नागरिकांना राष्ट्रवादी कॉंग्रे पार्टी कल्याणच्या वतीने मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी  जिल्हा सचिव प्रशांत माळी, कार्यध्यक्ष उदय जाधव यांच्या सयुक्त विद्यमानानेविधानसभा अध्यक्ष संदिप देसाई, महिला विधानसभा अध्यक्ष सुनिता देशमुख, युवक विधानसभा अध्यक्ष योगेश माळी तसेच ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे यांच्या अध्यक्षतेखाली हि मदत करण्यात आली आहे.



समाजसेवक जिवन वाघमारे, भावार्थ दौड,परिक्षीत अतकरे,मनिष खैरणार यांच्या उपस्थितीत कोकणवासींयाना मदत कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मान वंदना देऊन पुष्पहार अर्पन करत कोकण कडे दोन दिवसीय दौरयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. कर्तव्यातुन सेवा, माझे कोकण माझा महाराष्ट्र हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून जितक्या उत्साहाने कोकणात फिरायला जातोतितक्याच उत्साहाने कोकणाला मदत करण्यासाठी गेलो असून आम्ही पुढे आलो आपण ही या असे आवाहन यावेळी प्रशांत माळी यांनी नागरिकांना केले आहे. 

राष्ट्रवादीची कोकणातील पूरग्रस्तांना मदत राष्ट्रवादीची कोकणातील पूरग्रस्तांना मदत Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads