Header AD

हंगामी कामगारांच्या रखडलेल्या वेतनासाठी श्रमजीवी संघटनेचा भिवंडी पालिका मुख्यालय समोर भीक मांगो आंदोलन
भिवंडी दि 18 ( प्रतिनिधी ) महानगरपालिकेमध्ये  पाणी पुरवठा वॉलमन , बोअरवेल , पाईपलाई निगा दुरुस्ती विभागात काम करणारे सुमारे ८४ हंगामी कामगारांचे 4 महिन्याचे वेतन रखडल्याने श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिकासमोर ठिय्या मांडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे .           या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व कामगारांना पगारांची वेतन स्लिप तात्काळ द्यावी,  कामगारांचा भविष्य निर्वा निधी व किमान वेतनाचा फरक तात्काळ द्यावा  तसेच बोनस देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या असून मागील दोन वर्षां पासून श्रमजीवी संघटनेची कामगार संघ या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत.                    महापालिकेत पाणी पुरवठा वॉलमन , बोअरवेल , पाईपलाई निगा दुरुस्ती विभागात काम करणारे ८४ हंगामी कामगार हे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत असून कोरोना काळात  सर्व सामान्य कामगार मजूर वर्ग हातास काम नसल्याने मेटाकुटीला आलेला आहे.सदर कामगार वर्गाच्या कुटूंबांची विदारक परिस्थिती आली आहे. 
                या विरोधात संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारा वर कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला आहे .तब्बल पाच तास आंदोलन सुरू असताना पावसाची रिपरिप सुरू असतानाही हे आंदोलन सुरू ठेवून   भिक मांगो आदोलन केले त्यानंतर आयुक्त यांच्या अनुपस्थित मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून आंदोलन स्थगित केले.
हंगामी कामगारांच्या रखडलेल्या वेतनासाठी श्रमजीवी संघटनेचा भिवंडी पालिका मुख्यालय समोर भीक मांगो आंदोलन हंगामी कामगारांच्या रखडलेल्या वेतनासाठी श्रमजीवी संघटनेचा भिवंडी पालिका मुख्यालय समोर भीक मांगो आंदोलन Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads