Header AD

वर्ग मित्रां सोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले विद्यार्थी: ब्रेनली सर्व्हे
■मैत्रीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नसल्याचे सर्वेक्षणातून आले समोर ~


मुंबई, १९ ऑगस्ट २०२१ :  महामारीचा जगावरील सर्वात मोठा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष दळणवळण आणि एकत्र भेटण्यावरील मर्यादा. देशभरातील शाळा या ऑनलाईन सुरु असून यादरम्यान विद्यार्थी आपल्या वर्गमित्रांसोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग मंचाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात सामील सुमारे २००० विद्यार्थ्यांपैकी ८१% विद्यार्थ्यांनी मित्र किंवा वर्गमित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकत नसल्याची खंत व्यक्त केली.        विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात वर्गमित्रांशी सौहार्दपूर्ण संवाद हा खूप महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थी केवळ शिकतच नाहीत, तर त्यांच्या वर्गमित्रांसोबत सामाजिक संवादातूनही शिकत असत असतात, असे सर्वेक्षणातून दिसून आले. तसेच ब्रेनलीच्या ७५% विद्यार्थ्यांना शाळेची आठवण होते, हेही यातून स्पष्ट झाले. या निरीक्षणातून प्रत्यक्ष वर्गांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि सर्वोत्कृष्ट डिजिटल आणि शिक्षणाच्या प्रत्यक्ष पद्धतींचा मिलाप असलेल्या हायब्रिड भवितव्यासाठी शाळाच कशा पुढे असतील, हे त्यातून दिसून आले.        लहान मुले असो वा प्रौढ.. साथीचा आजार प्रत्येकासाठी कठीण ठरतो. घरात राहून शिक्षण घेताना तणाव जाणवला का, असे विचारले असता ४५% विद्यार्थ्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मुले तणावमुक्त करण्याचे उपक्रम घेत, त्यांच्या परीने विद्यार्थी त्यात सहभागी होतील, असे प्रयत्न शाळा करत आहेत. ६८% भारतीय विद्यार्थी म्हणाले की, घरी राहून शारीरिक शिक्षण घेण्यासाठी शाळा त्यांना प्रोत्साहित करतात.           याच वेळी, असेही दिसून आले की, तणावपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करत आहेत. मग त्यात पालक अथवा इंटरनेटची मदत यांचाही समावेश होतो. ब्रेनलीच्या ४६% विद्यार्थ्यांच्या मते, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे घरी राहून अभ्यास करणे सोयीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांचा हा अनुकुल प्रतिसाद पाहता, आघाडीचे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म, पीअर-टू-पीअर ज्ञान आदानप्रदान आणि चर्चा करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात, हे त्यामागील कारण असावे. कारण विद्यार्थी वर्गमित्र आणि समवयस्करांसोबत प्रत्यक्ष संवादासाठी आसुसले आहेत.      मोकळ्या वेळेचा वापर छंद जोपासण्यासाठी: सर्वेक्षणात सामील ५६% विद्यार्थी त्यांचा मोकळा वेळ इतर अॅक्टिव्हिटी आणि छंदासाठी देतात. विद्यार्थी ज्यात रस घेतात, अशा काही मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये नव्या अॅक्टिव्हिटी (४४%),टीव्ही पाहणे (३२%), व्हिडिओ गेम खेळणे (३०%), मित्रांसोबत हँग आऊट करणे (३०%) आणि सोशल मीडिया सर्फिंग करणे (१८%) यांचा समावेश होतो.       ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसानी म्हणाले, “ आमच्या ताज्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले की, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून तणावपूर्ण अभ्यासाशी जुळवून घेतले असले तरीही ते प्रत्यक्ष वर्गात जाण्यास उत्सुक आहेत. यावरून तंत्रज्ञान हे मित्रांसोबतच्या संवादाची जागा घेऊ शकत नाही, हे स्पष्ट होते. विशेष बाब म्हणजे, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म ४६% भारतीय विद्यार्थ्यांसाठी घरी राहून अभ्यास करणे सुलभ करत आहेत. म्हणजेच, साथीचा आजार कमी झाल्यानंतर तसेच शाळा पुन्हा उघडल्यानंतरही विद्यार्थी आणि पालक त्यांच्या शिक्षण प्रवासातील मदतीकरिता या सेवांचा वापर करतच राहतील.”

वर्ग मित्रां सोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले विद्यार्थी: ब्रेनली सर्व्हे वर्ग मित्रां सोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले विद्यार्थी: ब्रेनली सर्व्हे Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads