Header AD

कपिल पाटील यांच्या रूपाने आगरी समाजाला मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी


■नगरसेवक कुणाल पाटील यांनी केले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वागत...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कपिल पाटील यांच्या रूपाने आगरी समाजाला मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळाली असल्याचे उद्गार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी काढले आहेत. खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर सोमवारी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आगमन झाले असून यावेळी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कुणाल पाटील यांनी त्यांचे  स्वागत केले, यावेळी ते बोलत होते.


  

      आगरी-कोळी समाजाचे सर्वप्रथम केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची सोमवारी जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्यमंत्री कपिल पाटील यांना टाटा पॉवर, जकात नाका, कल्याण-शीळ रोड येथे भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



पहिल्यांदा आगरी समाजातील नेत्याला केंद्रीय पद मिळाले आहे. आमच्या भूमिपुत्राला इतका मोठा सन्मान मिळत असेल, तर त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने आमच्या समाजाला मुख्यप्रवाहात सामील होण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विषय नक्कीच मार्गी लागतील अशी आम्हा सर्व भूमिपुत्रांना अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी दिली. 

कपिल पाटील यांच्या रूपाने आगरी समाजाला मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी कपिल पाटील यांच्या रूपाने आगरी समाजाला मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads