Header AD

एमजी मोटर इंडियाची जिओसह भागीदारी


भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये अत्याधुनिक ‘कनेक्टेड कार सोल्यूशन्स’ प्रदान करण्यासाठी आले एकत्र ~


मुंबई, ३ ऑगस्ट २०२१ : सर्वोत्कृष्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एमजी मोटर इंडियाने आज भारतातील आघाडीचा डिजिटल सर्व्हिस प्रदाता- जिओसोबत इंटरनेट ऑफ थिंग्स क्षेत्राकरिता भागीदारीची घोषणा केली. ऑटो-टेकमध्ये आघाडीचे स्थान मिळवत एमजी मोटर इंडिया आगामी मिड-साइज एसयूव्हीमध्ये जिओच्या आयओटी सोल्युशन्सद्वारे आयटी सिस्टिमची सुविधा दिली जाईल.      या भागीदारीद्वारे कारनिर्माता नव्या युगातील दमदार सोल्युशन्स प्रदान करेल. भविष्यातील मोबिलिटी अॅप्लिकेशन्स आणि चमत्कारीक अनुभव देण्याचा कंपनीचा उत्साह यातून अधोरेखित होतो. जिओ या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम सेवा प्रदात्याने, विविध ग्राहक आणि उद्योग क्षेत्राला विविध सेवा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑटोमोटिव्ह सोल्युशन्सला समर्थन देईल. एमजीच्या आगामी मिड-साइज एसयूव्ही ग्राहकांना केवळ मेट्रो शहरांमध्येच नव्हे तर लहान गावे व ग्रामीण भागातही, उच्च दर्जाच्या कनेक्टिव्हिटीसहह जिओच्या व्यापक इंटरनेट नेटवर्कचा फायदा होईल.        जिओचे नवे युगातील कनेक्टेड व्हेइकल सोल्युशन हे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीचे मिश्रण असून याद्वारे यूझरला ट्रेंडिंग इन्फोटेनमेंट आणि रिअल टाइम टेलिमॅटिक्सची सुविधा प्रवासातही मिळते. त्यामुळे डिजिटल लाइफचे लाभ वाहनाला तसेच प्रवासातील लोकांनाही मिळतात.        एमजी मोटर इंडियाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “ वाहन क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नूतनाविष्कार कनेक्टेड कार क्षेत्रात आघाडीवर आहेत. सध्याचा ट्रेंड सॉफ्टवेअर चलित उपकरणांवर अधिक भर देत आहे. जिओसारख्या तंत्रज्ञान विकसकासोबत भागीदारी ही एमजी मोटर कंपनीला वाहन क्षेत्राकडे एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करेल. या भागीदारीमुळे आमच्या पुढील मिड-साइज कनेक्टेड एसयूव्हीमध्ये तंत्रज्ञान आधारीत सुरक्षितता आणि चालकाचा अनुभव अधिक सहज मिळेल.”         जिओचे संचालक व अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले, “भारतीय यूझर्ससाठी जिओ अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सोल्युशन्सची इकोसिस्टिम तयार करीत आहे. एमजी मोटर इंडियासोबतची भागीदारी ही या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जिओचे ईसिम, आयओटी आणि स्ट्रीमिंग सोल्युशन्सद्वारे एमजीच्या ग्राहकांना रिअल टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्सची सुविधा मिळेल. वाहन क्षेत्रात नूतनाविष्काराद्वारे तंत्रज्ञान क्रांतीकरिता आमची वचनबद्धता असून तोच मुख्य आधारस्तंभ आहे.”       वाहन क्षेत्रातील नूतनाविष्काराच्या परिवर्तनात आघाडी गाठत, एमजी मोटरने भारतातील कामकाजाला सुरुवात केल्यापासूनच ऑटो-टेक आविष्कारांवर भर दिला आहे. या कारनिर्मात्याने भारतीय वाहन क्षेत्रात अनेक नवे पायंडे पाडले आणि इंटरनेट/कनेक्टेड कार, ऑटोनॉमस लेवल वन एडीएएस टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांची मागणी वाढवली.      एमजी मोटर इंडियाने भारतातील प्रवासात सर्वप्रथम इंटरनेट-कनेक्टेड कार- एमजी हेक्टर लाँच केली. त्यानंतर प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही- एमजी झेड एस लाँच केली. कंपनीने लेव्हल१ ऑटोनॉमस फीचर्सयुक्त ग्लॉस्टर लाँच केली. यात ऑटोनॉमस इमर्जन्सी क्रेकिंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.  

एमजी मोटर इंडियाची जिओसह भागीदारी एमजी मोटर इंडियाची जिओसह भागीदारी Reviewed by News1 Marathi on August 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads