Header AD

शाळेत पायी येणाऱ्या ८ विद्यार्थीनीना सायकल भेट


■सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि श्रीस्वामी समर्थ मठ ट्रस्ट यांचा उपक्रम..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि श्रीस्वामी समर्थ मठ ट्रस्ट कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने शहापूर तालुक्यातील टेंभूर्ली शाळेतील ८ विद्यार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थिनीना शाळेत येण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत होती. यासाठी या सायकलचे वितरण करण्यात आले आहे.



        रविवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला टेंभूर्ली सहित आसपासचे ग्रामस्थ  उपस्थित होते. झेंडावंदन नंतर केंद्र प्रमुख दिमते सर यांच्या प्रयत्नाने के सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे व्यवस्थापक विजय कनौजिया यांच्या उपस्थितिमध्ये प्रमुख पाहुणे डॉ. राहुल दुबेडॉ. विशाल उबाळे आणि श्रीस्वामी समर्थ मठ ट्रस्टचे कोषाध्यक्ष गौरव कदम यांच्याहस्ते गरीब ८ विद्यार्थीनीना सायकल देण्यात आल्या.



        सायकल मिळाल्याने या विद्यार्थिनींची ३ ते ४ किलोमीटरची पायपीट वाचणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या विद्यार्थीनीना सायकल भेट दिल्याबद्दल शाळेच्या वतीने संस्थांचे आभार मानण्यात आले.

शाळेत पायी येणाऱ्या ८ विद्यार्थीनीना सायकल भेट शाळेत पायी येणाऱ्या ८ विद्यार्थीनीना सायकल भेट Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads