Header AD

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात


■नाशिक ओझर दिंडोरीमध्ये कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भटके विमुक्त आघाडीची संघटनांत्मक बांधणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज त्यांनी नाशिक शहरनाशिक ग्रामीणदिंडोरी व ओझर येथे दौरा करून कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.सकाळी बापुसाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  झालेल्या या बैठकीला  मा. आमदार नरेंद्र दादा पवारनाशिक पुर्व आमदार राहुलडिकलेभाजप नाशिक शहर अध्यक्ष गिरीशजी पालवेभटके-विमुक्त आघाडी महीला संयोजिका डॉ. उज्वलाताई हाकेउत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगेप्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी प्रदेश कार्यलयमंत्री राज खैरणार आदी उपस्थित होते. तर १० वाजता नाशिक शहर जिल्हा बैठकीमध्ये भटके विमुक्त पदाधिकारी यांना नरेंद्र पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.दुपारी २ वाजता आमदार देवयानी ताई फरांदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  दुपारी ३ वाजता नाशिक विभागीय आयुक्त यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन भटके विमुक्त समाजाच्या विविध मागण्यांचे व योजनाचे निवेदन दिले. त्यानंतर नरेंद्र पवार ओझरकडे रवाना झाले. ४ वाजता ओझर येथील वैष्णव देवी मंदिरात दर्शन घेऊन ओझर येथे नरेंद्र पवार यांच्याहस्ते भटके विमुक्त महिला शाखेचे उद्घाटन व वृक्षरोपण करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता दिंडोरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अवणखेड येथे भेट देऊन भाजप तालुका अध्यक्ष व आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच नरेंद्र जाधव यांच्या सत्कार  व वृक्ष रोपण करण्यात आले. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील रामनगर तांडा येथे भेट दिली व सेवालाल महाराजांचे पवार यांनी दर्शन घेतले. यावेळी  तांड्यातील समाज बांधवांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न व अडचणीची माहिती घेतली. यावेळी  भाजप पदाधिकारीकार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात भाजपा भटके विमुक्त आघाडीचे  महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात Reviewed by News1 Marathi on August 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads